कर्मधर्मसंयोग मर्म सात्विक जीवनविकासाचे

pages: 
158
price: 
200 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

कर्मधर्मसंयोग हा शब्द वापरला जातो `सुदैवाने’, लकिली’, अशा
अर्थाने !... `नशिबाने त्यावेळी मी तिथे होतो’ असे म्हणताना हा शब्द मनात
आणि वाणीमध्ये येतो.
परंतु विवेकनिष्ठ कर्म आणि विश्वप्रेमावर आधारित धर्म ह्यांचा संगम होणे
ही विकासाची उच्च आणि अप्रतिम अवस्था आहे, अशा अर्थाने ह्याच
शब्दाकडे पाहता येते… असे झाल्यावर रुजतो तो सत्त्वगुण! जीवनविकास
नेमके कशाला म्हणायचे? भौतिक सुखांच्या उतरंडीला, मान्यता आणि
प्रतिष्ठेच्या मापदंडांना, की अखंड सत्तास्थानाच्या प्राप्तीला?...
ह्या सार्‍या व्यांख्यांना `सत्त्वगुणा’चा स्पर्श झाल्याशिवाय खरा
जीवनविकास साधणार नाही, असे मानसशास्त्र आणि प्राचीन परंपरा ह्या
दोन्ही ज्ञानशाखा सांगतात. दैनंदिन व्यवहारी आयुष्यामध्ये धर्म, देव,
कर्मकांडे, दैव ह्या विषयांवरचे अनेक प्रश्न तुमच्या-आमच्या समोर असतात.
जीवनविकासाच्या दृष्टीकोनातून त्याकडे कसे पाहता येईल, ह्याचा विचार ह्या
पुस्तकात केला आहे.
व्यक्तिमत्त्व विकासाकडून Seif Actualization कडे जाणारी पाश्चात्त्य
मानसशास्त्रीय संकल्पना आणि जीवनविकासाला आध्यात्मिक चौकटीत
बसवणारी पौर्वात्य संकल्पना ह्यांचा हा संगम आहे, एकविसाव्या शतकातील
जिज्ञासू मनांसाठी !

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated