देवकी

pages: 
137
price: 
120 रु.
Edition: 
तिसरी
Cover Page: 

पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी गोमंतक-कोकण प्रदेशात भोगदासीचे जीवन जगणारी ‘भावीण’ ही जमात आज सुदैवाने लुप्त झाली आहे. पण एकेकाळी देव-देवळांच्या परिसरांत जीवन देवनिष्ठेने व्यतीत करणारी ‘भावीण’ जेव्हा लब्धप्रतिष्ठितांच्या वासनेची शिकार बनते, तेव्हाच्या अगतिक अवस्थेमध्ये ही आपुलकी, प्रीती देणारा कुणी प्रतिष्ठावान तिला भेटतो.


या कादंबरीतील ‘देवकी’ या सुंदर, उत्कट प्रीतीभावना हृदयात जागवणाऱ्या मुग्ध वृत्तीच्या भाविणीला विनाशाच्या काठावर असताना ‘बाबीकाका’ नावाचा बालमित्र, सहचर पुन्हा भेटतो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना या अव्यक्त प्रीतीच्या धाग्यांत सूक्ष्मपणे गुरफटलेल्या ‘दोन जीवांची व्याकुळ कहाणी’ मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या काव्यात्म, तरल शब्दकळेने रेखाटली आहे. वाचकाला ही कादंबरी एक हुरहूर लावणारा अनुभव देते.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )