कवडसे

pages: 
121
price: 
70 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

...या गरीब माणसाची बायको घेऊन माझा बाप गावोगाव वणवण भटकतो आहे – केवळ शरीराच्या सुखासाठी ! ही कल्पनाच मला जाणून घेता येत नव्हती.


अशा वासना पशुमध्ये सुद्धा नसतात. ही कसली आसक्ती असते? की जिच्यामुळे एखादी स्त्री पुरुषाच्या मागे लागते; दुसरी त्याच पुरुषापासून पळून जाते ?


समंजस निवेदकाच्या आत्मकथनातून निष्क्रिय-बदफैली बाप, सोशिक नि वत्सल आई, आपल्या दुर्दैवाला व दारिद्य्राला बोल लावणारा तिरसट भाऊ, स्खलनशील पण पापभीरू वहिनी आणि पुरुषी आकर्षणाच्या मोहाला बळी पडलेली सुस्वरूप पुतणी, अशी मोजकीच पात्रे ‘कवडसे’ कादंबरीत आहेत. या सर्व पात्रांच्या मानसिक आंदोलनांचा, परस्पर भावसंबंधांचा सूचक, कारुण्यपूर्ण आणि बहुमिती शोध दळवींनी ‘कवडसे’ मधून समर्थपणे घेतला आहे.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )