शकुंतला

pages: 
65
price: 
150 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

`शकुन्तला’ हे दीर्घ काव्य सुरुवाती पासून अखेरपर्यंत वाचकाच्या चित्ताचा वेध घेते. शकुन्तला ही नायिका कल्पून प्राचीन काळापासून आजपावेतो, तिच्या भोवती अनेक काव्ये, कथा, नाटके रचली गेली आहेत. शकुन्तला हा विषयच तसा प्रतिभावंताना मोह पाडणारा आहे. त्याची गोडी अवीट आहे. डॉ. कुडाळकरांनी तीच गोडी आपल्या कवितेतून रसिकांसाठी पुन्हा सादर केली आहे. या त्यांच्या काव्यातील काही पंक्ती तर विलक्षण मधुर आहेत. एक नवोदित कवी गेय स्वरुपाची गीतरचना, वृत्तांचा, जातींचा आधार घेऊन लिहितांना पाहिले की वाटते, भारतीय साहित्यशास्त्राने काव्य परंपरेने निर्माण केलेली काव्याची पायवाट अद्यापि लुप्त झालेली नाही. कुणीतरी एकाकी पांथस्थ श्रद्धेने वाटचाल करतो आहे आणि काव्यरसिकांना आनंद देतो आहे.
`शकुन्तला’ या दीर्घ काव्याबरोबरच डॉ. कुडाळकर यांनी अन्य रचनाही केलेल्या आहेत. नाविन्य आणि पारंपारिकता यांचा सुंदर मेळ त्यांच्या या कवितांतून घातलेला आढळतो.
डॉ. शांताराम कुडाळकर हे जसे शब्दांचे चित्रकार आहेत, तसेच ते रंगरेखा आणि कुंचला यांचेही उपासक आहेत. त्यांच्या कुंचल्यातून उतरलेले मुखपृष्ट या काव्यसंग्रहाची शोभा नक्कीच गहिरी बनवील. डॉ. शांताराम कुडाळकर यांची ही पहिलीच साहित्यकृती असल्याने त्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी काव्य प्रवासाला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.


-मधु मंगेश कर्णिक

Rate this post Not rated