मी `बॅरिस्टरचं कार्टं’ बोलतोय!

pages: 
105
price: 
100 रु.
ISBN: 
978-81-7432-047-6
Edition: 
पहिली
Cover Page: 

वैद्यकीय पेशामध्ये शहरापेक्षाही ग्रामीण भागात जास्त अंदाधुंदी आहे. कोणत्याही वैद्यकीय अधिकारी विनामूल्य सेवा देण्यास पगार घेऊनही तयार नाही. खाजगी दवाखाने स्वच्छ व चांगले ठेवा व ते रजिस्टर करा असा नियम होत आहे. याचवेळी शासनाने त्यांच्या शासकीय रुग्णालयातील संडास व बाथरूम कसे आहेत ते बघितल्यानंतरच इतरांकडे बोट करावे; कारण शासकीय नियम व कायदा हा भ्रष्टाचारी मातेच्या पोटीच जन्माला येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हा रक्तामधून आनुवंशिक जीनरूपाने जन्माला येत आहे. हेच आपले दुर्दैव होय.
लोकशाही फक्त कागदावर आहे. हे सर्व लिहिण्याचा व्याप फक्त माझ्या मनामध्ये साचून राहिलेल्या डबक्याला वाट काढून देण्याचा आहे.
सर्व काही संपले नाही; म्हणूनच मला भेटलेले वैष्णव पदोपदी आठवण करून देतात.
-डॉ. हिम्मतराव बावस्कर

Rate this post Not rated
( categories: )