माझ्या मनाची रोजनिशी

pages: 
114
price: 
80 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

एक किशोरवयीन मुलगी स्वत:शीच बोलते आहे, तिच्या रोजनिशीतून. तिच्या धसमुसळ्या शरीरात हळवं मन आता कुठे डहुळायला लागलं होतं. रंगीत चांद्यांसारखी इवली गुपितं मनाला चिकटत होती. बाळपणीच उंबरठा ओलांडताना हातात आईचा हात हवा होता. पण प्रेमाच्या मृगजळामागे लागलेल्या ममानं तिला दिला होता एकटेपणा. ती बावरली होती. कोवळ्या मनाला माणसांची गुंतागुंतीची नाती कोड्यात टाकत होती. नात्याने रेशमी पाश तिच्याही भोवती अलगद गुंफले जात होते. तुटणार्‍या प्रत्येक नात्याबरोबर ती कासावीस होत होती. या बावर्‍या मुलीकडे मात्र वळून पाहते आहे तिशीची प्रौढा. जुन्या रोजनिशीच्या पानावर उमटत आहेत आजच्या ‘मी’ची सुजाण स्वगतं!

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )