कर्मचार्‍यासाठी समुपदेशन

pages: 
152
price: 
120 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

औद्योगिक जगात, नाना प्रकारची माणसे वेगवेगळी कामे करण्यासाठी एकत्र येत असतात. ती माणसे, आपल्याला उपजत मिळालेले बुद्धीसारखे काही गुणविशेष व संपादित कौशल्ये, यांच्या साहाय्याने आपापली कामे करीत असतात. तथापि आपल्यापुढील दैनंदिन समस्यांना तोंड देताना, कित्येक कर्मचारी आपल्या मनात चिंता, क्रोध, विषण्णता इत्यादी अपथ्यकारक म्हणजेच अपायकारक भावना निर्माण करून आपल्या आनंदावर, कार्यक्षमतेवर व इतरांबरोबरच्या सलोख्याच्या संबंधांवर विरजण घालतात.
औद्योगिक संस्थांमध्ये मानवी साधन-संपत्तीच्या विकासासाठी जो स्वतंत्र विभाग असतो, त्यातील प्रशिक्षित अधिकारी वरीलसारख्या कर्मचार्‍याना समुपदेशन करीत असतात. परंतु अनेकदा त्या अधिकार्‍यानाही समुपदेशन कसे करावे, याबद्दल पद्धतशीर प्रशिक्षण मिळालेले नसते. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन, कि. मो. फडके यांनी विवेकनिष्ठ समुदपदेशनशास्त्रावर आधारलेले हे प्राथमिक पुस्तक लिहिले आहे.
व्यवस्थापकीय श्रेणीतील जे व्यावसायिक, मानवी साधन-संपत्तीच्या विकासासाठी कार्यरत असतील, त्यांना हे पुस्तक पद्धतशीर मार्गदर्शन करील. त्याचप्रमाणे, कोणत्याही विभागात व्यवस्थापकीय श्रेणीत काम करणार्‍यानाही, या पुस्तकाच्या मदतीने आपल्या हाताखाली काम करणार्‍या  कर्मचार्‍याना समुपदेशन करता येईल. इतकेच नव्हे, तर ज्या औद्योगिक संस्थांमध्ये समुपदेशनाची सोय नसेल, त्या संस्थांमधील कर्मचार्‍याना या पुस्तकाच्या अभ्यासाने, स्वतःचे मानसिक आरोग्य निकोप राखून, आपले काम आनंदाने व कार्यक्षमतेने करता येईल.

Rate this post Not rated