मॅजेस्टिक बुक स्टॉल

‘मॅजेस्टिक’चे संस्थापक श्री. (कै.) केशवराव कोठावळे यांनी १९४२ साली ‘औदुंबर’च्या छायेत, गिरगाव नाक्यावर ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ या नावाने पुस्तक-विक्री दुकानाची सुरुवात केली. त्यानंतर गिरगावातच सुरतवाला बिल्डिंगमध्ये दुसरे दुकान सुरू केले आणि त्यापुढे दादर/पुणे असा दुकानांचा विस्तार केला.

१९९७ साली ठाणे येथे सुरुवात झाली. भव्य आणि प्रशस्त अशा या वातानुकूलित ग्रंथदालनात हजारो पुस्तके वेगवेगळ्या विभागाप्रमाणे आकर्षकरित्या मांडलेली आहेत. वाचनसंस्कृती वर्धिष्णु व्हावी, वाचनाची गोडी लागावी, यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनाही आवर्जून सहभागी करून घेतले जाते. पुस्तकविक्रीला अधिक चालना मिळावी यासाठी ‘मॅजेस्टिक बुक क्लब’, ‘मॅजेस्टिक कार्ड होल्डर’ ‘मॅजेस्टिक भेट कुपन’ यांसारख्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. वाचकांचा या योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुस्तकविक्रीतील मोलाच्या योगदानासाठी ‘मॅजेस्टिक बुक डेपो’चे संचालक श्री. अशोक कोठावळे यांचा ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ न्यू दिल्ली तर्फे प्रथितयश पुस्तक-विक्रेता (Distinguish Book-sellers) हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.