कथा माझ्या जन्माची

pages: 
283
price: 
45 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

‘मी माझ्या सर्व जीवनाकडे जेव्हा मागे फिरून पाहतो, तेव्हा एखाद्या कड्यावरून दुर्बीण लावून समोरचा-दूरचा परिसर न्याहाळावा, तशी मला माझ्या जीवनाची वर्षे दिसतात. मी ज्या अस्पृश्यतेने जळलो, पोळलो, हिणकस अपमान सोसले, ती अस्पृश्यता अद्याप गेली नाही; ती घालवण्याबद्दल कीणी तळमळीने उठत नाही, याचे खाचखळगे आणि घाणेरडे प्रदेश हेच या दुर्बिणीतून दिसतात. मला – एक सुशिक्षित हरिजनाला जीवनात जेवढे करता आले, तेवढे करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. चांगली सुखाची आकाशवाणीची नोकरी सोडून रात्रंदिवस महाराष्ट्राचे तीन दौरे करून तो प्रयत्न केला. या पिढीत माझ्यासारख्याचा एक खारीचा खडा एवढे जरी त्याला महत्व आले, तरी शेकडो पिढ्या चाललेल्या या प्रयत्नांत मीही, एक कणभर का होईना, टाकला – एवढे जरी एखाद्याला वाटले, तरी मला समाधान मानले पाहिजे...’

Rate this post Not rated